मध्यरात्री घराच्या अंगणात बिबट्या फिरताना आढळला; वन विभागाने तातडीने पाहणी करण्याची स्थानिकांची मागणी
खेड (रत्नागिरी):
Ambavali Khed Leopard Sightings (खेड आंबवली बिबट्या वावर बातमी): रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आंबवली देऊळवाडी परिसरात बिबट्याचा मुक्त वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास एका घराच्या परिसरात बिबट्या फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मानवी वस्तीच्या अगदी जवळ बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मध्यरात्री घराच्या अंगणात बिबट्याचे दर्शन
मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सुमारे २ वाजता आंबवली देऊळवाडी येथील एका घराच्या आवारात बिबट्या आला. घराच्या परिसरात आणि रस्त्यावरून फिरतानाचे बिबट्याचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. हे फुटेज समोर आल्यानंतर परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली असून, ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आणि भीती दोन्ही पसरली आहे.
Ambavali Khed Leopard Sightings: सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
मानवी वस्तीजवळ बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना रात्रीच्या वेळी घराबाहेर एकटे सोडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
वन विभागाने या घटनेची तातडीने गंभीर दखल घेऊन आंबवली परिसराची पाहणी करावी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:15 19-08-2026














