Rain Forecast: कमी दाबाचे पट्टे अनुकूल.. पावसाचा जोर वाढणार; राज्यात दोन टप्प्यांत पावसाचा अंदाज

पुणे: राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार असून २५ ते ३० ऑगस्ट आणि पुढे १ ते ७ सप्टेंबर अशा दोन टप्प्यांत चांगल्या पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. देशातील बहुतांश भागांत कमी दाबाचे पट्टे अनुकूल होत असल्याने पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारपासून विदर्भात पावसाचा जोर विशेषतः वाढणार असून तेथे मुसळधार पावसाची शक्यता आहे.

देशात २१ ऑगस्टपर्यंत अत्यल्प पाऊस

गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. देशात सर्वत्रच २१ ऑगस्टपर्यंत खूप कमी पाऊस झाला असून त्यामुळे अनेक भागांत चिंतेचे वातावरण होते. मात्र, आता कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे वातावरणात बदल होत असून आगामी दिवसांत पावसाची तूट भरून निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 22-08-2026