Rajapur: फवारणी करताना विषबाधा झालेल्या प्रौढाचा मृत्यू

राजापूर तालुक्यातील चिखलगाव येथील घटना

राजापूर : प्रतिनिधी

शेतात तणनाशकाची फवारणी करताना विषबाधा झालेल्या ५५ वर्षीय प्रौढाचा उपचारादरम्यान मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात मृत्यू झाला. अनिल बुधाजी कोरगावकर (वय ५५, रा. चिखलगाव, ता. राजापूर) असे दुर्दैवी मृताचे नाव आहे.

उपचारादरम्यान मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार, १८ जुलै २०२६ रोजी चिखलगाव येथील शेतात तणनाशकाची फवारणी करत असताना औषध नाका-तोंडातून शरीरात गेल्याने अनिल कोरगावकर यांना विषबाधा झाली. त्यांची प्रकृती बिघडल्याने पत्नीने त्यांना प्रथमतः फणसाळी येथील फॅमिली डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.

त्यानुसार २२ जुलै रोजी त्यांना मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती अधिक खालावली. २३ जुलै रोजी त्यांच्यावर डायग्नोस्टिक तपासणी करण्यात आली आणि २४ जुलै रोजी पहाटे ४.१० वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

राजापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद याबाबत के.ई.एम. रुग्णालयाकडून राजापूर पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर, २२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.५६ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:03 24-08-2026