जकी खान यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

रत्नागिरी : शिवखोल, निवखोल येथील उबाठा चे कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान असणारे जकी खान यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला. तन्वी जमादार, साहिल पठाण, अजीम चिकटे, रिजवान मुजावर, अनिस यांच्या पुढाकाराने उबाठा गटातील सर्व कार्यकर्ते आज शिवसेनेत सामील झाले.

जकी खान यांच्यासोबत रशीद काजी, फरहान कादरी, मुबारक कादरी, नवीन मुल्ला, फकी जमादार, महबूब मुल्ला, सरजील भट्टीकडे, मुझे जमादार, समीर कादरी, मंजूर शेख, कौसर खान, सुफियान कादरी, शब्बीर खान, असच खान, सुभान शेख व हजारो कार्यकर्ते यांनी उदय सामंत यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केले.