Vidyanand Bapat Golap Ratnagiri: डीजे मुक्तीची वात पेटवणारे पुण्यातील विद्यानंद बापट मूळचे रत्नागिरीतील गोळपचे; आई-वडिलांचा पाठिंबा

पुण्यात मारहाण झाल्यानंतर गोळपमधील आई-वडिलांनी दिला धीर; ‘भिऊ नको, तब्येतीची काळजी घे’ म्हणत पोलिसांकडे संरक्षणाची मागणी करण्याचा सल्ला

रत्नागिरी:

Vidyanand Bapat Golap Ratnagiri: पुण्यात डीजेमुक्त गणेशोत्सवाचा आग्रह धरणारे आणि त्यावरून महाराष्ट्रभर चर्चेत आलेले विद्यानंद बापट हे मूळचे रत्नागिरी शहराजवळील गोळप गावचे रहिवासी आहेत. गुरुवारी पुण्यात विद्यानंद यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांची विचारपूस केली आणि “आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असा धीर दिला.

विद्यानंद बापट यांचे मूळ गाव रत्नागिरी तालुक्यातील गोळप हे असून हे गाव ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांचे गाव म्हणूनही ओळखले जाते. विद्यानंद बापट यांच्या या धाडसी भूमिकेमुळे आता हे गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यांचे वडील सुहास बापट आणि आई कल्पना बापट हे सध्या गोळप येथेच वास्तव्यास आहेत.

पुण्यात विद्यानंद यांना मारहाण झाल्याची बातमी समजताच त्यांच्या आई-वडिलांनी तात्काळ फोनवरून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. आई-वडिलांनी विद्यानंद यांना धीर देत, “तुझ्या भूमिकेच्या पाठीशी आम्ही ठाम उभे आहोत. तू भिऊ नकोस, स्वतःच्या तब्येतीची काळजी घे आणि पोलिसांकडे योग्य त्या संरक्षणाची मागणी कर,” असा महत्त्वाचा सल्ला व भावनिक साद घातली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 04-09-2026