Pavitra Portal Teacher Verification Ratnagiri: ‘पवित्र’च्या ३९६ शिक्षकांची झाली कागदपत्रांची पडताळणी; आज उर्वरित ७८ उमेदवारांची तपासणी

कागदपत्रांची जुळवणी करताना उमेदवारांची दमछाक; ७ ते ११ सप्टेंबरदरम्यान समुपदेशन करून दिली जाणार नियुक्ती पत्रे

रत्नागिरी :

Pavitra Portal Teacher Verification Ratnagiri: पवित्र पोर्टलद्वारे रत्नागिरी जिल्हा परिषदेला मिळालेल्या ४६७ शिक्षकांपैकी पहिल्या दोन दिवसांत ३९६ शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. स्व. शामराव पेजे सभागृहात सुरू असलेल्या या प्रक्रियेमध्ये पहिल्या दिवशी २०० पैकी १९६ शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी झाली, तर ४ शिक्षक गैरहजर राहिले. त्यानंतर गुरुवारी आणखी २०० शिक्षकांच्या कागदपत्रांची कसून तपासणी करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने निवड केलेल्या ४६७ उमेदवारांपैकी आता उर्वरित ७८ शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी आज, शुक्रवारी पार पडणार आहे. कागदपत्र पडताळणी प्रक्रियेत उमेदवारांचे शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, जात व वैधता प्रमाणपत्र, टीईटीचे (TET) गुण, दिव्यांग प्रमाणपत्र अशा तब्बल ३६ प्रकारच्या कागदपत्रांची शिक्षण विभागाकडून काटेकोर तपासणी केली जात आहे.

पडताळणीवेळी कोणताही कागद अपुरा राहू नये यासाठी नवोदित शिक्षक आपल्यासोबत आई-वडील, पती किंवा भावाला घेऊन आले होते. त्यामुळे पेजे सभागृहाबाहेर पालकांची व नातेवािकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. झेरॉक्स सेंटरवरही कागदपत्रांचे संच तयार करण्यासाठी उमेदवारांची मोठी धांदल उडाली होती.

७ ते ११ सप्टेंबरदरम्यान होणार समुपदेशन:

पवित्र पोर्टलतर्फे निवड झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, येत्या ७ ते ११ सप्टेंबरदरम्यान समुपदेशन (Counseling) प्रक्रिया पार पडणार आहे. या समुपदेशनानंतर शिक्षकांना त्याच दिवशी थेट नियुक्तीचे आदेश (Orders) दिले जाणार असून, त्यानंतर त्यांना तात्काळ संबंधित शाळांवर रुजू व्हावे लागणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 04-09-2026