Karwanchiwadi Phata Traffic Obstruction Case: कारवांचीवाडी फाट्यावर वाहतुकीस अडथळा आणणारी वाहने उभी; रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून दोघांवर गुन्हा दाखल

इतर वाहनांना व नागरिकांना धोका निर्माण केल्याने कारवाई

Karwanchiwadi Phata Traffic Obstruction Case: रत्नागिरी शहराजवळील कारवांचीवाडी फाटा येथे इतर वाहनांना आणि नागरिकांना अडथळा व धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने निष्काळजीपणे वाहने उभी केल्याप्रकरणी दोन चालकांविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ ऑगस्ट रोजी दुपारी ११:४० ते १२ वाजन्याच्या सुमारास पोलीस प्रशासनाकडून ही धडक कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद अशोक शिर्के (वय ४९, रा. करबुडे शिर्केवाडी, रत्नागिरी) याने आपली कार (क्र. एमएच-०८-यू-९१९६) आणि संजीवकुमार सुभाष डोंगरे (वय ३८, रा. श्रीनगर, खेडशी, रत्नागिरी) याने आपली कार (क्र. एमएच-०९-जीयू-८४१८) कारवांचीवाडी फाटा येथे अत्यंत गैरजबाबदारपणे उभी केली होती.

ही वाहने रस्त्यावर अशा पद्धतीने उभी करण्यात आली होती की, ज्या मुळे तेथून ये-जा करणाऱ्या इतर वाहनांना आणि पादचारी नागरिकांना मोठा अडथळा निर्माण होत होता. याप्रकरणी दोन्ही कारचालकांविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 04-09-2026