IAS Officers Transfer Maharashtra: ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या!

राज्य शासनाचे आदेश जारी; २०१४ च्या बॅचमधील नवोदित आयएएस अधिकाऱ्यांची विविध जिल्ह्यांत प्रकल्प अधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारीपदी वर्णी

मुंबई :

IAS Officers Transfer Maharashtra: महाराष्ट्र राज्य सरकारने गुरुवारी प्रशासनात मोठा फेरबदल करत ११ सनदी (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. या प्रशासकीय फेरबदलामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रवींद्र खेबुडकर यांची पुण्याच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे विद्यमान आयुक्त गजेंद्र बावणे यांची महावितरणच्या सह व्यवस्थापकीय संचालकपदी (छत्रपती संभाजीनगर) बदली झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आता पालघरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बसूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, पालघरचे सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांची यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे.

या बदल्यांमध्ये २०२४ च्या बॅचमधील नवोदित आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कालावधीनंतर विविध जिल्ह्यांत सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी म्हणून महत्त्वाच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. यामध्ये:

दोनुरु अनन्या रेड्डी: सहाय्यक जिल्हाधिकारी, पालघर

पी. के. सिद्धार्थ रामकुमार: प्रकल्प अधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी (जव्हार, पालघर)

योगेश कुमार मीना: सहाय्यक जिल्हाधिकारी, जळगाव

शिवांश सिंग: सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 04-09-2026