Namo Udyan Bhoomi Pujan Lanja: लांजात १ कोटी रुपये खर्चून उभारले जाणार ‘नमो उद्यान’; आमदार किरण सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

लांजा शहराच्या वैभवात पडणार भर; व्यायाम, विरंगुळा आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज जागेची निर्मिती

लांजा (प्रतिनिधी): लांजा शहरात एक कोटी रुपये खर्चून उभारले जाणाऱ्या आणि शहराच्या वैभवात मोलाची भर घालणाऱ्या ‘नमो उद्यान’चे भूमिपूजन आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी अत्यंत थाटात संपन्न झाले.

Namo Udyan Bhoomi Pujan Lanja: लांजावासीयांसाठी विरंगुळा अन् आरोग्याची सोय

लांजा शहराचा वाढता विस्तार, नागरिकांची वाढती गरज आणि शहरामध्ये नागरिकांना विरंगुळा, व्यायाम तसेच आनंददायी वातावरण मिळावे, या मुख्य उद्देशाने ‘नमो उद्यान’ साकारण्यात येत आहे. आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले हे उद्यान लांजावासीयांसाठी एक सुंदर आणि विलोभनीय सार्वजनिक जागा म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

‘लांजा शहराच्या विकासासाठी कटिबद्ध’ – आमदार किरण सामंत

नमो उद्यानाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले की, “लांजावासीयांना अभिमान वाटेल असे भव्य आणि उत्कृष्ट नमो उद्यान उभारले जाणार आहे. लांजा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली विविध कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यासाठी आपण पूर्णपणे कटिबद्ध आहोत.”

विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

या भूमिपूजन सोहळ्यास लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सावली कुरूप, उपनगराध्यक्ष मिलिंद उर्फ बाबा लांजेकर, मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, गटनेते योगेश कावतकर, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील उर्फ राजू कुरूप, लांजा तालुका प्रमुख गुरूप्रसाद देसाई, जिल्हा बँक संचालक महेश उर्फ मुन्ना खामकर, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, जयवंत शेट्ये, नगरसेवक वैभव जोइल, गुल्ल्या नेवरेकर, सचिन डोंगरकर, रविंद्र नागरेकर, सुधाकर कांबळे, ठेकेदार गणी मुल्लानी यांच्यासह सर्व नगरसेवक आणि लांजावासीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 08-09-2026