Jaigad Public Drinking Case: जयगड येथे सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल

बौद्धवाडी ते गणेशवाडी रस्त्याच्या कडेला झाडाखाली बसून मद्यपान करणाऱ्या नांदिवडेतील रहिवाशावर जयगड पोलिसांची कारवाई

जयगड : जयगड बौद्धवाडी ते गणेशवाडी जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला झाडाखाली बसून विनापरवाना दारू पिणाऱ्या एका ५४ वर्षीय व्यक्तीविरुद्ध जयगड सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jaigad Public Drinking Case: झाडाखाली बसून मद्यपान करताना पकडले

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी शैलेश आत्माराम शिरधनकर (वय ५४, रा. नांदिवडे भंडारवाडा, रत्नागिरी) हा रविवार, ६ सप्टेंबर रोजी दुपारी १२:४२ वाजेच्या सुमारास जयगड बौद्धवाडी ते गणेशवाडी मार्गावरील एका झाडाखाली बसून मद्यपान करताना आढळून आला.

त्याच्याकडे दारू पिण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसताना ‘इंग्लिश मास्टर डिलाइट’ या मद्याची १८० मिलीची बाटली घेऊन तो सार्वजनिक ठिकाणी उघडपणे मद्यपान करत असल्याचे पोलिसांच्या गस्तीदरम्यान निदर्शनास आले.

जयगड सागरी पोलिसांत गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलीस शिपाई प्रीतीश दशरथ लोटणकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून जयगड सागरी पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत कोणताही मुद्देमाल जप्त करण्यात आलेला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:53 08-09-2026