जयगड सागरी पोलिसांत भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई
रत्नागिरी : जयगड ते चाफे जाणाऱ्या मार्गावर सार्वजनिक रहदारीच्या ठिकाणी अत्यंत धोकादायक स्थितीत बल्कर उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध जयगड सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jaigad Chafe Road Traffic Obstruction: चाफे तिठ्याजवळ घडला प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, चालक राजेश लाल करण द्विवेदी (वय ३७, रा. सतना, मध्य प्रदेश) याने आपल्या ताब्यातील महिंद्रा कंपनीचा बल्कर (क्रमांक MH 43 BG 8573) चाफे गावाकडे जाणाऱ्या तिठ्याजवळ जयगड-चाफे मार्गावर सार्वजनिक रहदारीच्या ठिकाणी उभा केला होता. या बेजबाबदार कृत्यामुळे नागरिकांची ये-जा तसेच इतर वाहनांच्या वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होऊन संभाव्य अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला होता.
पोलीस शिपायाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद
ही घटना ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११:५० वाजता घडली. या प्रकरणी पोलीस शिपाई निलेश शिवाजी गुरव यांनी दिलेल्या तक्रारीवरून जयगड सागरी पोलिसांनी गुन्हा क्रमांक ६४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:46 08-09-2026














