Petrol Pump Fuel Tank Inspection Mandatory: पेट्रोल पंपांवरील भूमिगत टाक्यांची दररोज तीन वेळा तपासणी अनिवार्य; ई-२० इंधनाची गुणवत्ता राखण्यासाठी सरकारी तेल कंपन्यांचा मोठा निर्णय

Petrol Pump Fuel Tank Inspection Mandatory: पेट्रोल पंपांवरील भूमिगत टाक्यांची दररोज तीन वेळा तपासणी अनिवार्य; ई-२० इंधनाची गुणवत्ता राखण्यासाठी सरकारी तेल कंपन्यांचा मोठा निर्णय

पाण्यामुळे होणारे दूषितीकरण रोखण्यासाठी इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या ९३ हजारांहून अधिक पंपांना नवे निर्देश जारी

Petrol Pump Fuel Tank Inspection Mandatory: देशातील पेट्रोल पंपांवर उपलब्ध असणाऱ्या इथेनॉलमश्रित (ई-२०) इंधनाची उच्च गुणवत्ता जपण्यासाठी आणि थेंबाथेंबाची शुद्धता टिकवून ठेवण्यासाठी सरकारी तेल विपणन कंपन्यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या निर्णयानुसार, देशातील सर्व पेट्रोल पंपांना त्यांच्या भूमिगत साठवण टाक्या आणि इंधन भरण्याच्या नळ्यांची दर दोन ते आठ तासांनी (हवामानानुसार) तपासणी करण्याचे सक्तीचे निर्देश देण्यात आले आहेत. या कठोर तपासणीचा मुख्य उद्देश पाण्यातून होणारे इंधनाचे दूषितीकरण पूर्णपणे रोखणे हा आहे, कारण पाण्यात संपर्कात आल्यास ई-२० इंधनाची गुणवत्ता बिघडण्याची दाट शक्यता असते.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या तीन प्रमुख सरकारी तेल कंपन्यांद्वारे देशभरात चालवल्या जाणाऱ्या ९३ हजारांहून अधिक पेट्रोल पंपांना ही तपासणी आता बंधनकारक करण्यात आली आहे. सध्या इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियमच्या बहुतांश किरकोळ विक्री केंद्रांवर दर दोन ते चार तासांनी अनिवार्य तपासणी केली जाते. दुसरीकडे, भारत पेट्रोलियमने ही तपासणी वारंवारता काहीशी कमी करून ती दर आठ तासांनी एकदा अशी केली होती. मात्र, आता नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, २४ तास सुरू राहणाऱ्या केंद्रांवर दिवसातून किमान तीन वेळा, तर २४ तासांपेक्षा कमी वेळ सुरू राहणाऱ्या केंद्रांवर दोनदा तपासणी करणे प्रत्येक डीलरला आवश्यक असणार आहे.

विशेष पेस्ट वापरण्याचे निर्देश
साठवण टाक्यांमध्ये पावसाचे किंवा इतर मार्गाने पाणी शिरले आहे किंवा नाही, हे अचूकपणे तपासण्यासाठी सर्व डीलर्सना ‘अल्कोहोल रेजिस्टेंट वॉटर फाईंडिंग पेस्ट’ (Alcohol Resistant Water Finding Paste) वापरण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या प्रभावी उपाययोजनांमुळे ग्राहकांना निकृष्ट किंवा दूषित इंधन मिळणार नाही आणि वाहनांच्या इंजिनाचे संभाव्य नुकसान टाळण्यास मदत होईल.

Mobile hub