Chiplun Flyover Opening New Year: नवीन वर्षाच्या स्वागताला चिपळूणचा उड्डाण पूल खुला होणार; डिसेंबरअखेरपर्यंत सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन

Chiplun Flyover Opening New Year: नवीन वर्षाच्या स्वागताला चिपळूणचा उड्डाण पूल खुला होणार; डिसेंबरअखेरपर्यंत सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन

मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित उड्डाण पालाचे काम अंतिम टप्प्यात

Chiplun Flyover Opening New Year: मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथील बहुचर्चित उड्डाण पूल येत्या ३१ डिसेंबरपर्यंत पूर्णत्वाकडे नेऊन नवीन वर्षाच्या स्वागताला कोकण किंवा गोव्याकडे जाणवणाऱ्या पर्यटकांसाठी खुला केला जाणार आहे. या उड्डाणपूलाचे भरावाचे व डांबरीकरणाचे काम सध्या दिवस-रात्र युद्धपातळीवर सुरू असून, नोव्हेंबरअखेर डांबरीकरण आणि भरावाचे काम पूर्ण होणार असून उर्वरित कामे डिसेंबरमध्ये केली जाणार आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाच्या पूर्ततेसाठी तब्बल १७ वर्षांचा कालावधी लोटला असला तरी काम पूर्ण झालेले नव्हते. गणेशोत्सवापूर्वी चिपळूणमधील उड्डाण पूल वाहतुकीस खुला करण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले होते; परंतु पावसामुळे ते प्रयत्न निष्फळ ठरले. मात्र, आता संपूर्ण काम पूर्ण करून चिपळूणचा उड्डाण पूल नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. काही महिन्यांपूर्वी निर्माणाधीन उड्डाण पूल बहादूरशेख चौक येथे कोसळला होता, त्यानंतर पुलाचे डिझाईन बदलण्यात आले. आता पुलाचे काम पूर्ण झाले असून केवळ डांबरीकरण आणि जोडरस्त्याचा भरव शिल्लक आहे.

कामाची सद्यस्थिती आणि नियोजन:
मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाण पुलावरील डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. येत्या ८ ते १० दिवसांत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भागाचे डांबरीकरण होणार असून, ते झाल्यानंतर मास्टिक लेयर देण्यात येणार आहे. १.७८ किलोमीटर लांबीचा हा मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात मोठा उड्डाण पूल असून, सध्या पुलाला जोडणाऱ्या ३०० मीटर व १५० मीटर जोडरस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अतिथी हॉटेल ते प्रांत कार्यालयादरम्यान भरдаваचे काम युद्धपातळीवर सुरू असून, येत्या चार दिवसांत या ठिकाणच्या डेक स्लॅबचे काम सुरू होणार आहे. दुसऱ्या बाजूला डांबरीकरणाचे काम सुरू असून, पुलावर ११३ पथदीप बसवण्यात आले आहेत. डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर रंगरंगोटी केली जाणार असून थर्टी फस्टपूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेचा अंत संपत असून यावर्षी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात जाणारे पर्यटक याच उड्डाण पुलावरून रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोव्याकडे जाणार आहेत.

Mobile hub

मुंबई-गोवा महामार्गावर ८० किमी. प्रतिस तास वेग मर्यादा:
मुंबई-गोवा महामार्गाचा डीपीआर लक्षात घेता कोकणातील चौपदरीकरणाचा रस्ता वळणावळणाचा आणि चढ-उताराचा आहे. हे लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाने या रस्त्यावर वाहनांची वेग मर्यादा ८० कि.मी. प्रति तास इतकी ठेवलेली आहे. मात्र, अनेक वाहनचालक ही वेग मर्यादा ओलांडून मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने प्रवास करतात. अनेकवेळा घाट उतारावर इंजिन बंद करून गाड्या चालवण्याचा प्रयत्न होतो, ज्यामुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी कमीत कमी ५० ते ६० व जास्तीत जास्त ८० कि.मी. प्रति तास या वेगाने प्रवास करावा, म्हणजे आपला प्रवास सुरक्षित होईल, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग विभागाने केले आहे.