Marathi Medium Teacher Counseling Postponed: मराठी माध्यमाच्या उमेदवारांचे समुपदेशन आता दिवाळीनंतरच; मराठीचे २०२ उमेदवार वेटिंगवर, तर दुसऱ्या टप्प्यातील भरती अंतिम टप्प्यात

Marathi Medium Teacher Counseling Postponed: मराठी माध्यमाच्या उमेदवारांचे समुपदेशन आता दिवाळीनंतरच; मराठीचे २०२ उमेदवार वेटिंगवर, तर दुसऱ्या टप्प्यातील भरती अंतिम टप्प्यात

रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात; उर्दू माध्यमाचे समुपदेशन पूर्ण, शाळावाटपही झाले पूर्ण

Marathi Medium Teacher Counseling Postponed: रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. उर्दू माध्यमाच्या ८ उमेदवारांचे समुपदेशन नुकतेच पार पडले असून त्यांना शाळाही देण्यात आल्या आहेत. मात्र, मराठी माध्यमातील २०२ उमेदवार अद्याप वेटिंगवर (प्रतीक्षेत) असून, या सर्वांचे समुपदेशन आता दिवाळीनंतर होणार असल्याची माहिती शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. समुपदेशनासाठी अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार, असा संतप्त सवाल उमेदवार व पालक वर्ग उपस्थित करत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १ हजार १७ शिक्षकांची पदे रिक्त असून, पहिल्या टप्प्यात ४५७ शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यात गणित आणि विज्ञान विषयातील मराठीचे २२० उमेदवार पैकी १८ उमेदवारांनी दांडी मारली, तर २१० उमेदवारांपैकी ८ उर्दू उमेदवारांचे समुपदेशन होऊन त्यांना शाळा देण्यात आल्या आहेत. मात्र, मराठी माध्यमातील २०२ उमेदवारांच्या समुपदेशनाला अद्याप ब्रेक लागला आहे. दिवाळीपूर्वी उर्वरित उमेदवारांचे समुपदेशन होईल, असे सांगण्यात आले होते; परंतु ९ नोव्हेंबरपासून जिल्हा परिषद प्रशासनाला सट्ट्या (सुट्ट्या) असल्याने आता दिवाळीनंतरच मराठी गुरुजींचे समुपदेशन होणार आहे. असे असले तरी, नवीन वर्षाआधी मराठी शाळांना आणखी नवे गुरुजी मिळणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

शिक्षक भरतीची सद्यस्थिती एकाच दृष्टिक्षेपत:

Horizon techno.

एकूण शिक्षक पदे: २२८

मराठीचे उमेदवार: २०२

उर्दूचे उमेदवार: ८

एकूण शिक्षक: २१०

पहिल्या टप्प्यात भरले: ४५७

प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीषा जगदाळे यांनी स्पष्ट केले आहे की, पवित्र पोर्टलवरील दुसऱ्या टप्प्यातील उर्दू उमेदवारांचे समुपदेशन झाले असून त्यांना शाळा देण्यात आल्या आहेत, तर उर्वरित २०२ मराठी उमेदवारांचे समुपदेशन दिवाळीनंतर होईल. यामुळे प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार असून दिवाळीनंतर या प्रक्रियेला गती मिळणार आहे.