Agriwelfare Portal Launched: शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आता येणार सर्व शासकीय योजना; केंद्र सरकारच्या ‘अग्रि वेल्फेअर पोर्टल’मुळे योजना, अनुदान आणि पीकविमा एकाच क्लिकवर उपलब्ध

Agriwelfare Portal Launched: शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आता येणार सर्व शासकीय योजना; केंद्र सरकारच्या ‘अग्रि वेल्फेअर पोर्टल’मुळे योजना, अनुदान आणि पीकविमा एकाच क्लिकवर उपलब्ध

रत्नागिरीसह देशभरातील शेतकऱ्यांना घरबसल्या डिजिटल सेवांचा लाभ मिळणार; कागदपत्रे आणि सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याच्या त्रासातून सुटका

Agriwelfare Portal Launched: देशातील शेतकऱ्यांना आता विविध शासकीय योजना, आर्थिक मदत आणि शेतीविषयक अचूक माहितीसाठी सरकारी कार्यालयांत चकरा मारण्याची कोणतीही गरज उरलेली नाही. शेतकऱ्यांच्या हि लक्षात घेऊन केंद्रीय कृषी विभागाने विशेष असे ‘अग्रि वेल्फेअर पोर्टल’ (Agriwelfare Portal) लाँच केले आहे. या नाविन्यपूर्ण पोर्टलमुळे आता शेतकऱ्यांना घरबसल्या कृषी योजना, खते-बियाणे, अनुदान आणि इतर सर्व डिजिटल सेवांची माहिती मिळवणे अत्यंत सोपे होणार आहे.

या पोर्टलच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना डिजिटल सेवांचा सहज लाभ घेता येणार असून, कृषी क्षेत्रातील विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळण्याचा महत्त्वाचा मार्ग मोकळा झाला आहे. या पोर्टलवर शेतीविषयक अनेक महत्त्वपूर्ण सेवा आणि सुविधा एकाच क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये पीएम किसान योजना, पीक विमा, विविध कृषी अनुदानाची माहिती समाविष्ट आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा, काजू, भात आणि नारळ उत्पादक शेतकऱ्यांना या डिजिटल सुविधेचा खूप मोठा फायदा होणार आहे.

सोप्या भाषेत अचूक माहिती आणि सुलभ वापर शेतकऱ्यांना सहज समजेल अशा साध्या भाषेत या पोर्टलवर सर्व माहिती देण्यात आली असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. डिजिटल सुविधांचा प्रभावी वापर कसा करावा, यासाठी तज्ज्ञांकडून विशेष प्रशिक्षणही दिले जाणार आहे. या पोर्टलचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल किंवा संगणकाच्या ब्राऊजरमध्ये agriwelfare.gov.in हे संकेतस्थळ उघडावे. लॉगिन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व मोबाईल नंबर जवळ ठेवावा, त्यानंतर हवी ती योजना, अनुदान व पीक विम्याची माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध होईल.

Yash siddhi