Daily Horoscope 1 October 2026: आजचा दिवस १२ राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे सविस्तर राशीभविष्य

Daily Horoscope 1 October 2026: आजचा दिवस १२ राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे सविस्तर राशीभविष्य

ग्रहांच्या दुर्लभ योगात भगवान श्री गणेशाच्या व विठुरायाच्या कृपेने कोणत्या राशींचे भाग्य उजळणार? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Daily Horoscope 1 October 2026 म्हणजेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी वैदिक पंचांगानुसार पितृपक्ष पंधरवडा सुरू असताना आजचा दिवस अत्यंत खास मानला जात आहे. आजचा हा दिवस विघ्नहर्षा श्री गणेशाला समर्पित असून ग्रहांच्या विशेष हालचालींमुळे दुर्लभ योग जुळून येत आहे. या ग्रहांच्या स्थितीचा सकारात्मक व नकारात्मक प्रभाव सर्व १२ राशींच्या जातकांवर दिसून येईल.

१२ राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries): मेष राशीच्या महिलांना आजच्या दिवशी काही बाबतीत तडजोड करावी लागण्याची शक्यता आहे. एखादी गोष्ट मनाप्रमाणे न घडल्यास मनात कुढत न राहता संयम बाळगणे हितकारक ठरेल.

Baguass

वृषभ रास (Taurus): वृषभ राशीच्या व्यक्तींना निसर्गाच्या सानिध्यात फेरफटका मारण्याची संधी मिळेल. आज तरुणाईमध्ये मिसळल्यास मनातील उत्साह वाढेल आणि सकारात्मकता लाभेल.

मिथुन रास (Gemini): मिथुन राशीच्या जातकांच्या मनात नवीन मालमत्ता किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचे विचार असतील, तर त्या दृष्टीने आज योग्य पावले उचलायला काहीच हरकत नाही.

कर्क रास (Cancer): कर्क राशीच्या लोकांसाठी आज नवीन वाहन खरेदीचे उत्तम योग जुळून येत आहेत. त्या संदर्भात आज योग्य ते प्लॅनिंग सुरू करू शकता.

सिंह रास (Leo): सिंह राशीच्या जातकांना आज आर्थिक कामांसाठी किंवा पैसा उभा करण्यासाठी थोडे अतिरिक्त कष्ट घ्यावे लागतील. सर्वच गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत, हे गृहीत धरून चालावे.

कन्या रास (Virgo): कन्या राशीच्या व्यक्तींना प्रत्येक गोष्टीचा लाभ मिळण्यास जरा उशीर होईल. मात्र, मनात काहीतरी नवीन योजना आखण्याची व त्या राबवण्याची इच्छा निर्माण होईल.

तूळ रास (Libra): तूळ राशीचे लोक आज कामात पूर्ण यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करतील. विशेषतः विद्यार्थ्यांना आज अभ्यासात व क्षेत्रात मनाप्रमाणे यश मिळेल.

वृश्चिक रास (Scorpio): वृश्चिक राशीच्या जातकांनी आज कोणत्याच बाबीवर घाईघाईने प्रतिक्रिया देणे टाळावे. ‘मौनम सर्वार्थ साधनम’ या सूत्राचा अवलंब करणे आज तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

धनु रास (Sagittarius): धनु राशीच्या लोकांच्या कल्पकतेला आज दाद मिळेल. तुमच्यातील नावीन्यपूर्ण कल्पनांमुळे नवीन गोष्टी करण्याकडे आणि सकारात्मक बदल घडवण्याकडे तुमचा कल राहील.

मकर रास (Capricorn): मकर राशीच्या व्यक्तींमध्ये ‘मला सगळ्यांपेक्षा जास्त समजते’ असा अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे. या अहंकारामुळे इतरांशी फार काळ सुसंवाद टिकवणे कठीण जाऊ शकते.

कुंभ रास (Aquarius): कुंभ राशीच्या जातकांची अत्यंत स्वतंत्र वृत्ती आणि निर्णय क्षमतेतील थोडा कमकुवतपणा यामुळे आजूबाजूचे लोक व सहकारी काहीसे गोंधळात पडतील.

मीन रास (Pisces): मीन राशीच्या लोकांनी आज नोकरी किंवा व्यवसायात काहीही झाले तरी मानसिक ताण घ्यायचा नाही, हे निश्चित करून टाकावे. अन्यथा ताणामुळे प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे.