Ganpatipule Health Cell: अंगारकीनिमित्त गणपतीपुळ्यात वैद्यकीय मदत कक्ष; प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडचा उपक्रम

Ganpatipule Health Cell: अंगारकीनिमित्त गणपतीपुळ्यात वैद्यकीय मदत कक्ष; प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडचा उपक्रम

अंगारकी चतुर्थीला येणाऱ्या हजारो भाविकांना तातडीची प्राथमिक वैद्यकीय सेवा आणि आरोग्य मदत उपलब्ध

गणपतीपुळे (रत्नागिरी): रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री गणपती मंदिर, गणपतीपुळे येथे अंगारकी संकष्टी चतुर्थी यात्रोत्सवानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडच्या वतीने भाविकांसाठी विशेष वैद्यकीय मदत कक्ष सुरू करण्यात आला. अंगारकीनिमित्त श्रींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना तातडीची प्राथमिक वैद्यकीय सेवा व आरोग्यविषयक मदत मिळावी, या उद्देशाने या कक्षाची स्थापना करण्यात आली होती.

आरोग्य अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन अन् आरोग्य कर्मचाऱ्यांची तत्पर सेवा

अंगारकी चतुर्थी तसेच वार्षिक उत्सवांच्या काळात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या सूचनेनुसार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली अशा वैद्यकीय कक्षाचे नियोजन केले जाते. या वैद्यकीय मदत कक्षात वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता पवार, आरोग्य सहाय्यक डॉ. परशुराम निवेंडकर आणि राजेंद्र रणसे यांनी रुग्णांवर उपचारांची धुरा सांभाळली.

Tata altroz

त्याचप्रमाणे सीएचओ मनाली तारवे, माधुरी ठाकरे, आरोग्य सेवक प्रवीण मंडले, विक्रम जाधव, आशा सेविका सारिका गावणकर व मदतनीस सांची गावणकर यांनी उपस्थित राहून भाविकांना अखंडित आरोग्य सेवा दिली.

भाविकांकडून उपक्रमाचे स्वागत

अंगारकीच्या दिवशी मंदिरात आणि मंदिर परिसरात भाविकांची अलोट गर्दी असते. या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता आणि आरोग्याची योग्य काळजी घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडच्या वतीने राबवण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे दर्शनार्थी आणि स्थानिक भाविकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.