कोंडगाव तिठा ते बाजारपेठ मार्गावरील केतकरआळी येथील घटना; वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कारवाई
Negligent Parking Case : रत्नागिरी तालुक्यातील कोंडगाव तिठा ते बाजारपेठ मार्गावरील केतकरआळी तिठा येथे सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक स्थितीत टाटा सुमो गोल्ड गाडी उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप सखाराम कांबळे (वय ५९, रा. दाभोळे बौद्धवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. ही घटना २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजनाच्या सुमारास घडली.
वाहनांना व नागरिकांना अडथळा निर्माण केल्याचा प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, चालक दिलीप कांबळे याने त्याच्या ताब्यातील टाटा सुमो गोल्ड (क्र. एमएच-०२-ईयू-१६२०) ही गाडी सार्वजनिक रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना व नागरिकांना अडथळा होईल, अशा अत्यंत धोकादायक स्थितीत उभी केली होती. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आले.
भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंद
या प्रकरणी अनिल लक्ष्मण केसकर (वय ३१, नेमणूक साखरपा पोलिस दूरक्षेत्र, देवरुख पोलिस ठाणे) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.१६ वाजता गुन्हा रजिस्टर नं. १६३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक रस्त्यावर अस्ताव्यस्त व धोकादायक वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा आणणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.














