◼️ कोकण किनारपट्टीला यलो अलर्ट
रत्नागिरी : परतीच्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला सोमवारी रात्री झोडपून काढले. मंगळवारी पहाटेही रत्नागिरीच्या अनेक भागांत पाऊस झाला. पावसामुळे अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला. मंगळवारी सकाळी मळभी वातावरणात पावसाचा जोर ओसरलेला होता.
दरम्यान, मंगळवारी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३६.२९ मि.मी. च्या सरासरीने एकूण ३२६ मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली. परतीच्या हा पावसाचे सातत्य पुढील दोन दिवस राहणार आहे. रत्नागिरीसह कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ कायम आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने सरासरी चार हजार मि. मी.ची मजल पूर्ण केली असून २० टक्के जादा पाऊस झाला आहे.
गेल्या आठवड्यात ओसरलेला पाऊस या आठवड्यात सोमवारपासून सक्रिय झाला. जोरदार पावसाला गङाडाट आणि विजांच्या लखलखाटाची साथ लाभल्याने हा पाऊस परतीचा असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मंगळवारी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण सव्वातीनशे मि. मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वच तालुक्यांत ४० ते ७० मि. मी. पावसाची नोंद झाली. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस झालेली ही पावसाची नोंद विक्रमी असल्याचे सांगण्यात येते.
गतवर्षी या कालावधीत जिल्हा जवळपास कोरडा होता. मात्र, सोमवारी आणि मंगळवारी पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात आघाडी घेतली. मंडणगड तालुक्यात ३२ मि. मी, दापोली २८, खेड ४७, गुहागर २१, चिपळूण २३, संगमेश्वर सर्वाधिक ७२ मि.मी, रत्नागिरी ५३, लांजा ३७ आणि राजापूर तालुक्यात २७ मि.मी. पावसाची दिवसभरात नोंद झाली. दोन दिवस अनेक भगातील वीज प्रवाह खंडित झाला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 25-09-2024