Lanja KT Bandhara demand: लांजात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधा! दाजी गडहिरे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

Lanja KT Bandhara demand: लांजात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधा! दाजी गडहिरे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

लांजाच्या तहसीलदार प्रियंका ढोले यांना सुपूर्द केले निवेदन

लांजा – महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवते. कोकणातील पाणी अडवणे गरजेचे असून, लांजा तालुक्यामध्ये दुष्काळ निवारणासाठी कोल्हापूर पद्धतीचे (केटी) बंधारे बांधण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे लांजा तालुका अध्यक्ष दाजी गडहिरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

लांजा तहसीलदार प्रियंका ढोले यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे निवेदन देण्यात आले. दाजी गडहिरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, सध्या अल निनोमुळे मोठे संकट महाराष्ट्रासमोर उभे राहिले असून, त्यामुळे कोकणातील पाणी अडवणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे लांजा तालुक्यातील खेडेगावातील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी, त्या शेजारून वाहणारे लहान-मोठे परे, ओढे, नाले किंवा नद्या अशा ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात यावेत.

Swami swaru. Pat.

प्रत्येक गावात २ ते ३ बंधारे मंजूर करण्याची मागणी

कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले तर पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी लागणारे पाणी यावर उपाय होऊ शकतो. तरी लांजा तालुक्यातील सर्व गावांमध्ये कमीत कमी २ ते ३ बंधारे मंजूर करावेत, अशी आग्रही मागणी दाजी गडहिरे यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.