Dapoli : माटवण येथे म्हशी चारण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Dapoli : माटवण येथे म्हशी चारण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

दापोली तालुक्यातील माटवण जंगलात म्हशी चारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा ओढ्याच्या पाण्यात पडून मृत्यू; दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

दापोली – म्हशी चारण्यासाठी जंगलात गेलेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा ओढ्याच्या पाण्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दापोली तालुक्यातील माटवण येथे घडली आहे. हरी विठ्ठल खाते (वय ६५, रा. माटवण, मूळ रा. पालगड गवळीवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास हरी खाते हे म्हशी चारण्यासाठी माटवण रस्त्यालगतच्या जंगल परिसरात गेले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास म्हशी घरी परतल्या, मात्र खाते घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. रात्री साडेसातच्या सुमारास कातळी येथील ओढ्याच्या पाण्यात ते पडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

Shitit jyotish