खेड तालुक्यातील सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मद्यप्राशन करणाऱ्या तरुणाविरोधात खेड पोलिसांनी केली कायदेशीर कारवाई
खेड – तालुक्यातील नातुनगर मोहल्ला बसथांब्याजवळ गोवा-मुंबई महामार्गालगत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या एका तरुणावर खेड पोलिसांनी कारवाई केली आहे. मंदार विजय मुकनाक (वय २७, रा. नातुनगर, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास घडली.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित मंदार मुकनाक याच्याकडे मद्यप्राशन करण्याचा कोणताही परवाना नसताना तो नातुनगर मोहल्ला बसथांब्यावळील महामार्गालगतच्या मोकळ्या जागेत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करताना आढळून आला. सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण केल्यामुळे त्याच्याविरोधात दारूबंदी कायदा अन्वये खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.














