Rajapur: अर्जुना नदीपात्रात सापडला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

Rajapur: अर्जुना नदीपात्रात सापडला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

सौंदळ येथे ४५ ते ५० वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; राजापूर पोलिसांकडून शोध सुरू

राजापूर – तालुक्यातील सौंदळ येथील अर्जुना नदीच्या पात्रात एका अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह रविवारी आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे असून, अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.

नदीपात्रात आढळला तरंगणारा मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, सौंदळ येथील कोड परिसरातील राजू सातकूट यांच्या आंब्याच्या बागेजवळून वाहणाऱ्या अर्जुना नदीच्या पाण्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. स्थानिक पोलीस पाटील समृद्धी सिद्धांत पाटील यांनी तात्काळ याबाबत राजापूर पोलिसांना माहिती दिली.

SONA HERBAL

राजापूर पोलिसांकडून पंचनामा

घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत व्यक्तीच्या अंगात चॉकलेटी रंगाची हाफ पॅन्ट असून, पाण्यात राहिल्यामुळे चेहरा, तोंड व संपूर्ण शरीर फुगून पांढरट-लालसर झाले होते. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम राजापूर पोलीस करत आहेत.