Dapoli: जालग्राम चोरगेवाडीत एकाची आत्महत्या; दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

Dapoli: जालग्राम चोरगेवाडीत एकाची आत्महत्या; दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

४८ वर्षीय व्यक्तीची राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या

दापोली – तालुक्यातील जालग्राम चोरगेवाडी येथे एका ४८ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. सचिन तुकाराम शिंदे (वय ४८, रा. जालग्राम चोरगेवाडी, दापोली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, १ नोव्हेंबर रोजी पहाटे पावणेतीनच्या सुमारास सचिन शिंदे हे घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांच्या पत्नीच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तातडीने शेजाऱ्यांना बोलावून मदतीची मागणी केली. त्यानंतर उपस्थितांनी शिंदे यांना खाली उतरवून तातडीने उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

या दुर्दैवी घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू (Accidental Death) म्हणून करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Arihant 1