Maharashtra Epstein Files Trailer : ‘महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित; भोंदूबाबा अशोक खरात यांच्या भूमिकेत मनोज जोशी

Maharashtra Epstein Files Trailer : 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स'चा थरारक ट्रेलर प्रदर्शित; भोंदूबाबा अशोक खरात यांच्या भूमिकेत मनोज जोशी

२० नोव्हेंबर रोजी चित्रपट होणार प्रदर्शित; सुबोध भावे, दिपाली सय्यद आणि उदय टिकेकर प्रमुख भूमिकेत

मुंबई:

गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात उत्सुकतेचा विषय ठरलेल्या ‘महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स’ (Maharashtra Epstein Files) या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. भोंदूबाबा अशोक खरात याच्या वादग्रस्त व्हिडिओ समोर आल्यानंतर या भूमिकेत कोणता कलाकार झळकणार यावरून पडदा उठला आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी हे भोंदूबाबा अशोक खरातची मुख्य आणि आव्हानात्मक भूमिका साकारत असल्याचे या ट्रेलरमधून स्पष्ट झाले आहे.

Maharashtra Epstein Files Trailer : राजकीय अन् सामाजिक गुपिते होणार उघड
स्वरूप बी. सावंत (Swaroop B Sawant) दिग्दर्शित या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. या चित्रपटात सुबोध भावे, दिपाली सय्यद, उदय टिकेकर आणि माधुरी पवार यांच्या अत्यंत महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या घोषणेनंतर अनेक अडचणी आणि वाद निर्माण झाले होते, तरीही सर्व अडथळ्यांवर मात करत हा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून राजकीय तसेच सामाजिक वर्तुळातील अनेक धक्कादायक आणि गंभीर गुपिते बाहेर येतील असा दावा केला जात आहे.

Arihant 1

मनोज जोशींचा कडक डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल
ट्रेलरच्या सुरुवातीलाच भोंदूबाबा अशोक खरात (मनोज जोशी) आपल्या आलिशान चारचाकी गाडीतून खाली उतरताना दिसतो आणि त्याच्यासोबत दिपाली सय्यद पाहायला मिळते. ट्रेलरमधील त्याचा प्रभावी संवाद सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. "माणसाच्या भविष्याच्या रेषा जर भोंदू बाबाच ठरवत असतील तर, बाबा होण्यातच फायदा आहे. चमत्कार को ही नमस्कार करते हे लोग. हात बघायचा, हात दाखवायचा. पहिले दे फिर ले.. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. बाबा थोरात आता महाराष्ट्राच्या घराघरात… आशीर्वाद!" हा डायलॉग प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.