Manoj Jarange 500 Crore Audio Clip SIT Inquiry : ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी मनोज जरांगे पाटील एसआयटीला क्लिप देणार; ‘सोर्स’च्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांकडे हमीची मागणी

Manoj Jarange 500 Crore Audio Clip SIT Inquiry : ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी मनोज जरांगे पाटील एसआयटीला क्लिप देणार; 'सोर्स'च्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांकडे हमीची मागणी

प्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वाखालील त्रिस्तरीय एसआयटी चौकशी सुरू

मुंबई:

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी ५०० कोटींच्या देवाण-घेवाणीचा संवाद असलेली ऑडिओ क्लिप सार्वजनिक करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली होती. या कथित क्लिपनंतर महायुती सरकारमधील भाजप आणि शिवसेना यांच्यातच राजकीय कलगीतुरा पाहायला मिळाला होता. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) आता मनोज जरांगे पाटील यांच्याशी अधिकृत संपर्क साधून पत्राद्वारे संबंधित ऑडिओ क्लिपची मागणी केली आहे.

ऑडिओ क्लिप आणि ‘सोर्स’ देण्यास जरांगे तयार, पण सुरक्षेची अट
चौकशी समितीच्या पत्रानंतर मनोज जरांगे पाटील यांनी तपास यंत्रणांना ही ऑडिओ क्लिप देण्याची पूर्ण तयारी दर्शवली आहे. "मी ऑडिओ क्लिप तर देईनच, शिवाय ही क्लिप देणाऱ्या ‘सोर्स’ची माहितीही पुरवेन. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती ऑडिओ क्लिप देणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही, याची ठाम शाश्वती द्यावी," असे जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

Shanti 4

अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वात एसआयटी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या खळबळजनक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांच्या एसआयटीची नेमणूक करण्यात आली आहे.

या बहुचर्चित ऑडिओ क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मनोज जरांगे यांना ५०० कोटी रुपये पाठवण्यात आल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला होता. "मला ५०० कोटी दिले म्हणून माझ्या नावाने कुणी पैसे घेतले का? मला खरंच ते दिले का?" असा सवाल उपस्थित करत मनोज जरांगे यांनी या क्लिपमागील मुख्य सूत्रधारांचा बुरखा फाडण्यासाठी निष्पक्ष चौकशीची मागणी केली होती. आता एसआयटीच्या तपासातून नेमके काय सत्य बाहेर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.