Diwali Celebration 2026: दीपोत्सवाच्या स्वागतासाठी कोकण सज्ज; बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची तुफान गर्दी

Diwali Celebration 2026: दीपोत्सवाच्या स्वागतासाठी कोकण सज्ज; बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची तुफान गर्दी

दिवाळीनिमित्त आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्यांनी बाजारपेठांना रंगत; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी

रत्नागिरी:
दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण मानला जातो. अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवणारा हा दीपोत्सव अश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आता दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यातील विविध गावांमधील बाजारपेठा आकर्षक वस्तूंनी पूर्णपणे सजल्या आहेत.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये रंगीबेरंगी आकाशकंदील, आकर्षक पणत्या, विविध प्रकारच्या रांगोळ्या, तोरणे तसेच घर सजावटीच्या साहित्याची अनेक दुकाने ठीकठिकाणी थाटण्यात आली आहेत. पारंपरिक सजावटीच्या साहित्याबरोबरच आधुनिक डिझाइनच्या वस्तूंनाही ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सायंकाळच्या वेळेत खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या ग्राहकांमुळे बाजारपेठांमध्ये चांगलीच गर्दी जमू लागली आहे.

महिलावर्गाकडून रांगोळ्या, पणत्या आणि सजावटीच्या साहित्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जात असून, लहान मुलांमध्येही आकाशकंदील खरेदीचा विशेष उत्साह दिसून येत आहे. या उत्सवी माहोलमुळे व्यापारी वर्गातही आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काही दिवसांत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घरोघरी स्वच्छता, रंगरंगोटी आणि सजावटीची तयारी सुरू झाली असून, सर्वत्र दीपोत्सवाच्या स्वागताची जोरदार लगबग सुरू झाली आहे.

Swami swaru. Pat.