संगमेश्वर रेल्वे स्थानकात चार एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा; ठाकरे सेना आक्रमक, कोकण रेल्वे सीएमडियांना पत्र

संगमेश्वर रेल्वे स्थानकात चार एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा; ठाकरे सेना आक्रमक, कोकण रेल्वे सीएमडियांना पत्र

संयुक्त बैठक घेण्याची मागणी; जि.प. सदस्य संतोष थेराडे यांच्या पुढाकाराने ‘जनपत्र मोहीम’ तीव्र

देवरुख :
संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर चार महत्त्वाच्या साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीसाठी आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. या प्रश्नावर रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ ठोस निर्णय घेण्यात यावा आणि सद्यस्थिती स्पष्ट करण्यात यावी, यासाठी जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांना पत्र पाठवून उच्चस्तरीय संयुक्त बैठक आयोजित करण्याची ठाम मागणी केली आहे.

संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर बांद्रा-मडगाव (१०११५/१६), श्री गंगानगर (१६३११/१२), अजमेर-एरणाकुलम मरुसागर (१२९७७/७८) आणि जवलपूर-कोईम्बतूर (०२१९७/९८) या चार साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, अशी स्थानिकांची आणि प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या संदर्भातील प्रस्ताव केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे पाठवून जवळपास सात महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, अद्याप यावर कोणellही अंतिम निर्णय झालेला नसल्याने संगमेश्वरमधील प्रवासी वर्गात आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या मागणीला व्यापक जनसमर्थन मिळवून देण्यासाठी संगमेश्वरकरांनी सध्या प्रभावी ‘जनपत्र मोहीम’ सुरू केली आहे. नागरिकांकडून कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने विनंती अर्ज पाठवले जात असून, या मोहिमेला दिवसेंदिवस लोकांचा प्रचंड पाठिस्ाद मिळत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या जनभावनांची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

Arihant 1

या पार्श्वभूमीवर, कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रवासी प्रतिनिधी यांची एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी संतोष थेराडे यांनी पत्राद्वारे केली आहे. या बैठकीत चारही एक्सप्रेस गाड्यांच्या थांबा प्रस्तावाच्या सद्यस्थितीवर, रेल्वे बोर्डाकडून सुरू असलेल्या कार्यवाहीवर आणि निर्णय घेण्यास होत असलेल्या विलंबाइमागच्या कारणांवर सविस्तर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीने आता जनआंदोलनाचे स्वरूप ધારण केले असून, कोकण रेल्वे प्रशासन या संयुक्त बैठकीला सकारात्मक प्रतिसाद देऊन संगमेश्वरकरांच्या या मागण्यांना न्याय देणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.