संगमेश्वर : महामार्गावरील शिंदे-आंबेरीनजीक धोकादायक खड्डे

कडवई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील शिंदे आंबेरीजवळ असलेल्या डायव्हर्जनजवळ पडलेल्या खड्यांमुळे वाहनचालकांसमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. या खड्यांमुळे वाहने जोरात आदळून त्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. विशेषतः दुचाकी चालकांना या खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे हे खड्डे पाण्याने भरून जातात, त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि यामुळे अपघाताची शक्यता वाढत आहे. महामार्गावरील या ठिकाणी लवकरात लवकर डांबरमिश्रित खडीने खड्डे भरून हा मार्ग वाहनचालकांसाठी सुरक्षित करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 11/Nov/2024