Donald Trump Election Impact Gold Rate: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाच्या पराभवाचा झटका; सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ

Donald Trump Election Impact Gold Rate: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाच्या पराभवाचा झटका; सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ

२४ तासांत सोने ७ हजार तर चांदी १५ हजार रुपयांनी महागले; जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम

जळगाव:
अमेरिकेतील राजकीय घडामोडींचा आणि निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला मिळालेल्या पराभवाचा थेट फटका जागतिक बाजारपेठेसह महाराष्ट्राची सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफा बाजाराला बसला आहे. गेल्या २४ तासांत जळगावच्या बाजारात सोन्याच्या दरात तब्बल ७ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात १५ हजार रुपयांची प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून जागतिक अर्थकारणात आणि सोन्या-चांदीच्या दरांमधील चढ-उतारांमागे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वक्तव्ये मुख्य कारणीभूत मानली जात होती. आपल्या वक्तव्यांनी जागतिक बाजारपेठेत खळबळ उडवून देणाऱ्या ट्रम्प यांच्या पक्षाला तेथील जनतेने निवडणुकीत धक्का दिल्याने त्याचे थेट पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारात उमटले आहेत.

या राजकीय बदलांनंतर गेल्या २४ तासांत डॉलर इंडेक्स (Dollar Index) आणि बाँड यील्ड (Bond Yield) मध्ये मोठी घसरण झाली. डॉलर कमजोर होताच सुरक्षित गुंतवणूक म्हणून जगभरात सोन्या-चांदीची मागणी अचानक वाढली, ज्यामुळे जळगावच्या बाजारपेठेतही दर गगनाला भिडले आहेत.

Shanti real estate 1

जळगाव बाजारातील नवे दर:

सोने: काल १३८,००० रुपयांवर असलेले सोन्याचे दर आज ७ हजार रुपयांच्या वाढीसह १४५,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहेत.

चांदी: काल १८०,००० रुपयांवर असलेले चांदीचे दर आज तब्बल १५ हजार रुपयांनी वाढून थेट १९५,००० रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचले आहेत.

अमेरिकेतील या सत्तापालट आणि राजकीय घडामोडींमुळे आगामी काळातही मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये मोठी अस्थिरता राहण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.