रत्नागिरीकरांना दिवाळीची भेट! येत्या सोमवारी (९ नोव्हेंबर) शहरातील पाणीपुरवठा सुरू राहणार

रत्नागिरीकरांना दिवाळीची भेट! येत्या सोमवारी (९ नोव्हेंबर) शहरातील पाणीपुरवठा सुरू राहणार

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेचा निर्णय; पुढील सोमवारपासून पुन्हा पाणी कपात कायम, पाणी जपून वापरण्याचे सभापती निमेश नायर यांचे आवाहन

रत्नागिरी : अल निनो या सागरी प्रवाहाच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन रत्नागिरी शहरात सध्या दर सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. मात्र, गुरुवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ पासून दिवाळी सणाला सुरुवात झाली असल्याने नागरिकांची पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन, येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ रोजी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रत्नागिरी नगरपरिषदेने घेतला आहे.

फक्त दिवाळीनिमित्त सवलत; पुढील सोमवारपासून कपात कायम :

सणासुदीच्या काळात नागरिकांची, विशेषतः महिला भगिनींची पाण्याअभावी कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ही सवलत केवळ येत्या सोमवारपुरती (९ नोव्हेंबर) मर्यादित असणार आहे. त्यानंतर पुढील सोमवारपासून पावसाळ्याच्या (मान्सूनच्या) नियमित आगमनापर्यंत दर सोमवारी शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत बंद ठेवण्यात येणार आहे, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.

Shanti real estate 1

पाण्याचा अपव्यय टाळा, सहकार्य करा :

शहरातील उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांतही नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, पाण्याचा कोणताही अपव्यय टाळावा आणि नगरपरिषदेच्या पाणी नियोजन मोहिमेला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन रत्नागिरी नगरपरिषदेचे पाणी सभापती श्री. निमेश नायर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.