विविध मान्यवरांचा सत्कार आणि नवीन समितीची घोषणा
Abhar Mandal Annual Meeting: रत्नागिरीतील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि आरोग्य क्षेत्रातील अग्रेसर संस्था असलेल्या ‘आभार सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, रत्नागिरी’ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकتیच येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये उत्साहात संपन्न झाली. श्री विनोद हळदवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला श्री शरदजी गोळपकर, श्री प्रवीण सावंतदेसाई, श्री शंकर उर्फ दादा वाडेकर आणि महिला अध्यक्षा सौ. प्रेरणाताई विलणकर उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करून उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त, जमा-खर्च अहवाल आणि ऑडिट रिपोर्टचे वाचन करून उपस्थितांच्या सर्वानुमते त्यास मंजुरी देण्यात आली. पुढील वर्षाचे अंदाजपत्रक ठरवताना रत्नागिरी जिल्ह्यातील भजनी कलाकारांना एकत्र आणून त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘जिल्हास्तरीय भजन संमेलन’ आयोजित करण्याचा अत्यंत महत्त्वाचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.
नवीन समितीची रचना आणि स्मरणिकेची घोषणा
जिल्हास्तरीय भजन संमेलन आणि आगामी उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी एका नवीन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये श्रीमती राजश्री लोटणकर (अध्यक्ष), श्री अनंत घाटविलकर (उपाध्यक्ष), श्री प्रसाद राणे (सचिव), श्री विनायक डोगरे (खजिनदार), बुवा श्री मिलिंद आरेकर (उपसचिव), श्री संतोष धनावडे (उपखजिनदार) यांच्यासह श्री सुधीर मिरजुळकर, श्री महेश पवार, श्री मदन डोर्लेकर, श्री संजय मेस्त्री, श्री निलेश मेस्त्री, श्री रत्नदीप लिंगायत, सौ. आकांक्षा वायंगणकर, सौ. संगीता येलपुला, सौ. मंदा चौघुले, सौ. वेदा शेट्ये आणि सौ. रेश्मा शिंदे यांचा समावेश आहे. तसेच या निमित्ताने एका विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले.

कलाकारांचा सत्कार आणि मनोगत
या बैठकीदरम्यान ‘माऊली महिला नमन मंडळा’तील कलाकारांना मानधन वाटप करण्यात आले आणि पुढील सर्व कार्यक्रमांसाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देण्यात आल्या. महिला मंडळ शाखा, रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळ आणि माऊली महिला नमन मंडळ ही सर्व आभार संस्थेचीच अपत्ये असून, याच संस्थेमुळे आम्हाला हक्काचे व्यासपीठ मिळाल्याचे उद्गार श्रीमती राजश्री लोटणकर यांनी काढले. आपल्यासोबतच आपली संस्था मोठी करणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याचे श्री शरदजी गोळपकर यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना श्री विनोद हळदवणेकर म्हणाले की, संपूर्ण कार्यामध्ये सर्वांचे योगदान लाभल्यास संस्थेबरोबरच आपलेही नाव मोठे होते आणि विविध उपक्रम राबवून आपले कर्तृत्व आपणच उज्वल करू शकतो.
या सभा सोहळ्यात ‘आयकॉल शिक्षक पुरस्कार’ प्राप्त श्री मदन डोर्लेकर गुरुजी आणि विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल सौ. सरिता चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मंडळाचे सचिव श्री वासुदेव वाघे यांनी मानले.













