Sasale Rajapur Bison Menace: ससाळे परिसरात गव्यांच्या मुक्तसंचाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; शेती आणि काजू बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Sasale Rajapur Bison Menace: ससाळे परिसरात गव्यांच्या मुक्तसंचाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; शेती आणि काजू बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

सकाळच्या वेळी गावादवळ आणि मंदिरासमोर गव्यांचे कळप फिरत असल्याने शेतकऱ्यांसमोर सुरक्षेचा प्रश्न; वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Sasale Rajapur Bison Menace: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ससाळे परिसरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचा मुक्तसंचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गावादवळ आणि अगदी लोकवस्तीच्या परिसरात सकाळच्या वेळी गव्यांचे कळप सर्रास दिसून येत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गव्यांच्या या वाढत्या वावरामुळे स्थानिक शेतकरी आणि बागायतदार चिंतेत असून, शेतीचे व काजू कलमांच्या बागांचे अतोनात नुकसान होत आहे.

ससाळे गावातील लोकवस्तीच्या आसपास तसेच गावाच्या मध्यवर्ती भागात गवे फिरताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी सकाळी साधारणपणे साडेसहा वाजण्याच्या सुमारास श्री गांगेश्वर मंदिरासमोरील रस्त्यावर गव्यांचा एक मोठा कळप फिरताना ग्रामस्थांच्या निदर्शनास आला होता. या वाढत्या वावरामुळे सकाळच्या वेळी शेतात जाणारे शेतकरी, महिला तसेच शाळकरी मुले आणि अन्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. अचानक गव्यांचा सामना झाल्यास नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने, वनविभागाने या प्रकरणी तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

गव्यांनी केवळ रस्त्यावरच नव्हे, तर परिसरातील नागरिकांच्या काजू बागांचेही अतोनात नुकसान केले आहे. काजू कलमांच्या बागांमध्ये गव्यांचा वावर वाढल्यामुळे लहान कलमे तुडविली जात आहेत, झाडांचे नुकसान होत आहे तसेच शेतीचे अन्यतोड नुकसान होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. आधीच अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक संकटांमुळे हवालदिल झालेला शेतकरी आता वन्यप्राण्यांच्या या वाढत्या उपद्रवामुळे अधिकच आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे वनविभाच्या अधिकाऱ्यांनी ससाळे परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून गव्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच बागांच्या संरक्षणासाठी त्वरित योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी आर्त हाक ससाळेतील ग्रामस्थांनी दिली आहे.

Anant hights