Chiplun Theft News: चिपळूणमधील मंगल कार्यालयातून पावणेदोन लाखांचे मंगळसूत्र चोरीस; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Chiplun Theft News: चिपळूणमधील मंगल कार्यालयातून पावणेदोन लाखांचे मंगळसूत्र चोरीस; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

कोंडमळा येथील साखरपुडा समारंभात वराच्या खोलीतून हँडबॅगमधील दागिन्यावर डल्ला; पोलिसांकडून तपास सुरू

चिपळूण: चिपळूण (Chiplun) तालुक्यातील कोंडमळा येथील शारदा मंगल कार्यालयात सुरू असलेल्या एका साखरपुड्याच्या कार्यक्रमादरम्यान वराच्या खोलीत ठेवलेल्या हँडबॅगमधून १ लाख ८७ हजार ३४९ रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केले आहे. दि. १ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात (chiplun theft news) अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

याप्रकरणी मूळच्या ठाणे पूर्व येथील कोपरी भागातील नाना सोसायटीत राहणाऱ्या सौ. जागृती संदेश मोरे (वय ३२) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोहळ्याच्या गडबडीत लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने हा ऐवज लांबवल्याने कार्यालयातील सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.

नेमकी घटना कशी घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चोरीचा प्रकार दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० ते दुपारी ५ वाजण्याच्या दरम्यान कोंडमळा येथील शारदा मंगल कार्यालयात घडला. फिर्यादी सौ. जागृती मोरे यांनी आपले सोन्याचे मंगळसूत्र सांभाळण्यासाठी आपल्या आईकडे दिले होते. त्यांच्या आईने दागिन्याचा बॉक्स आपल्या हँडबॅगमध्ये सुरक्षित ठेवून ती बॅग सोबत घेत मंगल कार्यालयात साखरपुड्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

Folk.us

कार्यक्रमादरम्यान त्यांनी ती हँडबॅग वराच्या खोलीत (रूममध्ये) ठेवली होती. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने त्या बॅगेतील ४४.४८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी-मंगळसूत्र पट्टीचे डिझाईन व दोन सोन्याच्या डवल्या असलेले सुमारे १ लाख ८७ हजार ३४९ रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले.

नातेवाईकांकडे चौकशीनंतर पोलिसांत तक्रार
मंगळसूत्र गहाळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर मोरे कुटुंबीयांनी सुरुवातीला कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नातेवाईकांकडे व परिसरात शोध घेतला. मात्र, उशिरापर्यंत दागिन्याचा काहीच पत्ता न लागल्याने अखेर चोरी झाल्याची खात्री पटली. त्यानंतर विलंबाने का होईना, सौ. जागृती मोरे यांनी चिपळूण पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार नोंदवली.

या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ (अ) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सीसीटीएनएस (CCTNS) कार्यप्रणालीच्या माध्यमातून पोलीस करत आहेत.