Dapoli News: दापोली उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटर पुन्हा सुरू; नियमित उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा

Dapoli News: दापोली उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटर पुन्हा सुरू; नियमित उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा

वेतनाच्या प्रश्नामुळे काही दिवस सेवा राहिली होती बंद; रुग्णांची गैरसोय दूर झाल्याने नातेवाईकांनी व्यक्त केले समाधान

दापोली: दापोली उपजिल्हा रुग्णालयातील तात्पुरते बंद असलेले मोफत महाडायलिसिस सेंटर पुन्हा एकदा रुग्णसेवेसाठी सुरू करण्यात आले आहे. यामुळे नियमित डायलिसिस उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे (dapoli dialysis center reopened). सेंटर बंद असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत होती आणि डायलिसिससाठी अन्य ठिकाणी धावपळ करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती.

महाराष्ट्रातील विविध डायलिसिस सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्यामुळे काही ठिकाणी ही सेवा बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. याच पार्श्वभूमीवर दापोलीतील डायलिसिस सेंटरही काही दिवस बंद राहण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नियमित डायलिसिसवर अवलंबून असलेल्या रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती.

रुग्णांची गरज लक्षात घेऊन सेवा पूर्ववत
रुग्णांची आरोग्यविषयक निकड आणि उपचारांचे महत्त्व लक्षात घेऊन दापोली उपजिल्हा रुग्णालयातील हे डायलिसिस सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. सध्या या केंद्रामध्ये रुग्णांना नियमितपणे डायलिसिसची सेवा दिली जात आहे. हे सेंटर पुन्हा कार्यान्वित झाल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Swami swaru. Pat.

"दापोली उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली असून रुग्ण या ठिकाणी नियमितपणे उपचार घेत आहेत."

— महेश भागवत, अधीक्षक, दापोली उपजिल्हा रुग्णालय