साखरपा : साखरपानजीक असणाऱ्या दख्खन गावात सोमवारी तिघेजण खेकडे पकडण्यासाठी आंबा घाटाजवळ असणाऱ्या ओझरे खिंड येथे गेले होते. त्यातील वृद्धाचा रात्रीच्या अंधारात मार्ग भरटकला. यावेळी ते चालत असताना पडल्याने जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. सुरेश गोरुले (वय ६०) असे त्यांचे नाव आहे.
सचिन जाधव, शिवराम घुमे आणि सुरेश गोरुले असे तिघेजण सोमवारी खेकडे पकडण्यासाठी गेले होते. मात्र, रात्री उशीर झाल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने तिघेही भरकटले. यामुळे त्यांना मुख्य रस्त्यावर यायचा मार्ग सापडत नव्हता. यावेळी रात्रीच्या वेळी पडल्याने सुरेश गोरुले यांचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती पोलिस विभागाकडून प्राप्त झाली.
या घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलिस दूरक्षेत्राचे कर्मचारी पोलिस निरीक्षक अतुल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी पोहचले. या घटनेतील मृतदेह पोलिसांनी दुपारी साखरपा प्रा. आ. केंद्रात आणला. या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदेश जाधव, नितीन जाधव, तानाजी पाटील आदी करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 25-09-2024
