राजापूर : येथील प्रांताधिकारी कार्यालयाची इमारत उभी राहावी, अशी मागणी पूर्ण होत आहे. पुढील वर्षभरात अद्ययावत व सुसज्ज प्रशासकीय इमारत उभी राहील. या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या कामांची पूर्तता करताना ही इमारत विकासाचे केंद्र कसे बनेल, या दृष्टिने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कटिबद्ध असले पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
राजापूर तहसीलदार कार्यालयाच्या आचारात नवीन प्रांताधिकारी कार्यालय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार अॅड. हुस्नबानू खलिफे, सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार, प्रांताधिकारी डॉ. जाम्मिन, तहसीलदार विकास गंबरे, यांना तहसीलदार प्रियंका ढोले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अशफाक हाजु दोषक नागले, जिल्हा बँकेचे संचालक अमजद बोरकर, राजापूर अर्बन बँक संचालक हनिफ मुसा काझी, संजय ओगले, पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले, तर प्रांताधिकारी डॉ. जास्मिन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, तर किरण सामंत यांच्या हस्ते कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सामंत म्हणाले, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार असल्याने या इमारतीचे उद्घाटनही आम्हीच करू. या प्रशासकीय इमारतीमध्ये कामासाठी येणारी प्रत्येक व्यक्ती समाधानाने परत गेली पाहिजे, असे काम करा.
या कार्यक्रमाला नायब तहसीलदार दीपाली पंडित, दीपक कुळ्ये, महसूल नायब तहसीलदार गुरव, आदीसह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रांताधिकारी डॉ. जास्मिन यांनी, तर सूत्रसंचालन तलाठी गुरव यांनी केले. आभार तहसीलदार गंबरे यांनी मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 25/Sep/2024