रत्नागिरी : शहरातील माळनाका येथे मंगळवारी सकाळी १०.४५ वा. सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कूल बसला दुचाकीची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळी स्कूल बस (एमएच-०८-ई-९१२५) ही माळनाका येथे रस्त्याच्या कडेला पार्क केली होती. त्याच सुमारास सचिन पवार हा दुचाकीस्वार आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच ०८- एएम-६७३५) घेऊन जयस्तंभ ते मारुती मंदिर असा भरधाव वेगाने जात असताना त्याने या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कूल बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, दुचाकीचा पुढच्या भागाचा चक्काचुरा झाला होता. बसची मागील बाजूची काच फुटून दुचाकी चालकाच्या डोक्यात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. तेथील नागरिकांनी रिक्षातून जखमी सचिन पवार याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा केला. अपघातातील गंभीर जखमी सचिन पवार हा बेशुद्ध असल्याने सायंकाळपर्यंत त्याचा जबाब नोंदवला नव्हता. तसेच या अपघाताबाबत रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 25/Sep/2024