रत्नागिरी : रेल्वे कर्मचाऱ्याला अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. विलास भागूराम जाधव (वय ५१, रा. श्रीगणेशा अपार्टमेंट- पाडावेवाडी, मिरजोळे, रत्नागिरी) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २९) सकाळी पावणे आठच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास विलास जाधव यांना अस्वस्थ वाटू लागले त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासून मृत घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:32 30-11-2024