रत्नागिरी : विधानसभा निवडणूक काळात शिवसेना- भाजप महायुतीच्या उमेदवाराला मदत करणारे आणि महायुतीचा धर्म न पाळणारे असे भाजपमध्ये दोन प्रवाह निर्माण झाले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत दुही निर्माण झाली असल्याचे चित्र आहे.
शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्यासाठी भाजपच्या काही नेत्यांनी जोरदार प्रचारकार्य केले. त्याचवेळी दुसरा एक गट महायुती उमेदवाराविरोधात पूर्णपणे सक्रिय होता. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
भाजपचे जे काही नेते महायुतीचा धर्म पाळत होते. त्यांना महायुती उमेदवाराविरोधात काम करणाऱ्या भाजपच्याच नेत्यांनी अडचण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून ज्या भागात मतदाराशी संपर्क साधला जात होता तेथून महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात आले होते.
निवडणूका संपल्यानंतर आता विरोधातील गट आहे त्यांच्याकडून नगरसेवक पदाच्या निवडणुकीची तयारी केली जात आहे. यासाठी होणाऱ्या कामांबाबत निवेदने देऊन आंदोलने करण्याचा पवित्रा घेतला जात आहे. या प्रक्रियेपासून महायुतीच्या उमेदवाराला मदत करणाऱ्या गटाला दूर ठेवले जात आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पहिल्या गटाने आपापल्या प्रभागातील मतदारांशी संपर्क साधून महायुती उमेदवाराला मदत केली. त्याचवेळी त्या नेत्यांचाही मतदारांशी संपर्क झाला असल्याने त्यांची नगरसेवक निवडणूकीतील बाजू भक्कम झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:50 30-11-2024