उभ्या दुचाकीला डंपरने उडवले; स्वाराचा जागीच मृत्यू

संगमेश्वर : कोळंबे येथील स्टॉपवर रस्त्याबाहेर दुचाकीवर उभ्या असलेल्या स्वाराला डंपर चालकाने चिरडल्याची घटना नुकतीच घडली आहे. या अपघातात प्रौढाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर मुजोर डंपर चालक डंपर घेवून फरार झाला आहे. ही घटना १ वाजण्याच्या सुमारास घडली. मुजीब जाफर सोलकर (५०, कुरधुंडा, मुस्लीम मोहल्ला संगमेश्वर) असे ठार झालेल्या प्रौढाचे नाव आहे. तो कोळंबे ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. तोपर्यंत डंपर चालक फरार झाला होता. अपघाताची माहिती मिळताच कुरधुंडा, मुस्लीम मोहल्ला येथील बांधव आक्रमक झाले आहेत.

सविस्तर वृत्त असे की, मुजीब सोलकर हे कोळंबे येथे रस्त्याच्याबाहेर दुचाकी उभी करून बोलत होते. याच दरम्यान संगमेश्वरच्या दिशेने जाताना डंपर चालकाने सोलकर यांना रस्त्याबाहेर जावून उडवले. एवढंच नव्हे तर अपघातानंतर त्याने डंपर सुसाट वेगाने संगमेश्वरच्या दिशेने पळवला, कोळंबे ग्रामस्थांना याची माहिती मिळताच ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी डंपर चालकाचा पाठलाग केला मात्र तो दिसून आला नाही. नंबर प्लेट नसल्यामुळे त्याचा शोध घेणे कठीण होते.

अपघाताची माहिती मिळताच कुरधुंडा येथील मुस्लीम मोहल्ल्यातील बांधव मोठ्या संख्येने जमा झाला आहे. या अपघाताची खबर संगमेश्वर पोलीसांना मिळताच संगमेश्वर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहीतीनुसर ग्रामस्थांनी डंपर पकडला आहे. मात्र चालक फरार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:11 02-12-2024