राजापूर : अर्जुना व कोदवली नदीपात्रातील गाळ उपशाला प्रारंभ

राजापूर : शहरातील अर्जुना व कोदवली नदीपात्रातील गाळ उपशाच्या कामाचा शुभारंभ बुधवारी राजापूर, लांजा,- साखरपा विधानभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.

राजापूर शहर वासीयांवरिल पुराची टांगती तलवार कायम स्वरूपी दूर करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून यापुढेही गाळ उपशासाठी आवश्यक लागणार निधी आपण शासनाकडून मंजूर करून आणताना या दोन्ही नद्या गाळमुक्त करतानाच राजापूर शहर पूरमुक्त करण्याचा आपला संकल्प असल्याचे यावेळी आ. सामंत यांनी सांगितले.

शासनाच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक सन २०२४-२५ च्या अंतर्गत यासाठी सुमारे ६४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. आ. किरण सामंत यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला आहे. या कामाचा प्रारंभ बुधवारी करण्यात आला. जवाहर चौक कोदवली नदीपात्र ते पुढे गणेश विसर्जन घाटापर्यंत गाळ उपसा करण्याकामी २४ लाख ८२ हजार ४६ तर अर्जुना नदीपात्रात कोंढेतड पुल ते राजीव गांधी क्रिडांगणापर्यंत गाळ उपसा करण्यासाठी ३८ लाख ७४ हजार ८११ इतका निधी मंजूर झाला आहे.

शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने हे गाळ उपशाचे काम केले जाणार आहे.

या प्रसंगी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थिती कोदवली नदीपात्रात हा प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, शिवसेन उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू तालुकाप्रमुख दीपक नागले, राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी भाजपाचे ज्येष्ठ नेते महादेव गोठणकर अमजद बोरकर, माजी उपनगराध्यक्ष विजय हिवाळकर, भाजपा शहर अध्यक्ष संदेश आंबेकर, भाजपा मोहन घुमे, शीतल पटेल, हर्षद खानविलकर, मजिद पन्हळेकर, विवेव गादीकर, संचालक संजय ओगले भाजपा युवा मोर्चाचे अरवींद लांजेकर शिवसेनेचे मन्सूर काझी, एजाज बांग उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 12/Dec/2024