रत्नागिरी : मिऱ्या गावच्या विकासासाठी करण्यात येणारी कामे अतिशय दर्जाहीन केली जात आहेत, असा आक्षेप घेत नुकतेच मिऱ्यावसीयांनी साखळी उपोषण केले. आमदार उदय सामंत यांनी याची दखल घेतली. तत्काळ त्या कामांची पाहणी करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले होते. त्यानुसार गुरुवारी मिऱ्या-नागरपूर महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यात आली.
यामध्ये अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा गेल्या आहेत, खचला आहे, ७ ठिकाणी मोऱ्या नाहीत, अशा अनेक बाबी उघडकीस आल्या आहेत. यावर तत्काळ अंमल करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिल्या. मिऱ्यावासीयांनी १५ ऑगस्टला कामांविषयी प्रशासनाला निवेदन दिले होते. परंतु कोणत्याही कामामध्ये सुधारणा झाली नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 13-12-2024














