रत्नागिरी : शहरातील गवळीवाडा मित्रमंडळाचा दत्त जयंती उत्सव समितीच्या दत्त जयंती उत्सवाला सुरुवात झाली असून, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी (ता. १२) सकाळी नित्याची पूजा, लघुरूद्र आणि सायंकाळी सहा वाजता भजन व रात्री आठ वाजता विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाले. १३ ला नित्यपूजा, सायं. सहा वा. भजन व रात्री ८ वा. सुपर डान्स शो झाला. शनिवारी (ता. १४) सकाळी नित्यपूजा, सायं. ५ वा. सुश्राव्य कीर्तन, ६.३९ ला श्रींचा जन्मोत्सव व पालखी मिरवणूक. रात्री आठ वाजता लहान मुलांच्या स्पर्धा. १५ ला रात्री ८ वा. हिंदी, मराठी सुमधूर गीतांचा कार्यक्रम कोल्हापूर येथील ऑकेस्ट्रा, १६ला महाप्रसाद होणार आहे.
कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गवळीवाडा मित्रमंडळ व दत्त मंदिर उत्सव समितीचे अध्यक्ष अॅड. विजय पेडणेकर व खजिनदार राजेंद्र कीर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 14-12-2024














