राजापूर तालुक्यातील वाटूळ येथे शासनाचा डिएमएलटी कोर्स सुरु

राजापूर : तालुक्यातील वाटूळ येथे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी रॅलीस फाउंडेशन तर्फे डिएमएलटी म्हणजेच वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ डिप्लोमा कोर्स आदर्श विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज वाटूळ, राजापूर येथे सुरु करण्यात आला आहे. हा कोर्स महाराष्ट्र शासन सलग्न प्राप्त असून शासनाच्या माफक फी मध्ये उपलब्ध आहे. हा कोर्स १० वी १२ विचा कोणत्याही शाखेचा विद्यार्थी करू शकतो. तसेच तालुक्याबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व्यवस्था देखील उपलब्ध आहे. त्यामुळे हा कार्स करण्यासाठी आता कोकणातील मुलांना मुंबई, कोल्हापूर, पुणे, सांगली येथे जाण्याची गरज भासणार नाही. हा कोर्स पूर्णवेळ असून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश खुला करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी 9370898755 / 9405763875 या क्रमांकावर पवार सर यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

JMBR ACADEMY – ADMISSIONS OPEN!