पावस परिसरातील आंबा बागेत काम करणाऱ्या कामगाराचा उपचारांदरम्यान मृत्यू

रत्नागिरी : तालुक्यातील पावस परिसरातील आंबा बागेत काम करणाऱ्या कामगाराचा झाडावरुन पडल्याने उपचारांदरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना गुरुवार १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा. सुमारास घडली. महादेव नारायण नारकर (वय ६०) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

गुरुवार १२ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास ते पावस परिसरातील आंबा बागेत झाडावर चढून काम करत होते. त्यावेळी तोल जाउन ते खाली पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु, उपचारांदरम्यान सांयकाळी ५ वा. सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 16/Dec/2024