रत्नागिरी : देवरूख येथील भारती राजवाडे यांना पुणे येथील साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन व सर्च फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुणे येथे हा सोहळा झाला. गेली १० वर्षे भारती राजवाडे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत. सामाजिक बांधिलकीतून समाजकार्य करत असून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोफत मार्गदर्शन, अकरावी, बारावी विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन कोचिंग क्लासेस उपक्रम राबवणे, वसतिगृहातील मुलींसाठी सॅनिटरी पॅड मोफत वितरण करणे, शाळेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शाळेच्या विकासाच्या प्रगतीसाठी रोख रक्कम स्वरूपात मदत करणे, अशा विविध क्षेत्रांतील कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.
समारंभाला अभिनेत्री चित्रा दीक्षित, सिनेस्टार अभिनेते बाळराजे वाळुंजकर, भक्ती साधू, अन्वी घाडगे, सचिन हळदे, राहुल निकाळजे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:16 16-12-2024














