साखरपा : आपण जनतेचा आमदार आहे, तुमची विकासकामे किंवा समस्या मला सांगा, असे आवाहन राजापूर, लांजा, साखरपा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांनी केले. साखरपा येथे विकासकामांचा आढावा व कार्यकत्यांच्या भेटीसाठी आले असता ते बोलत होते.
यावेळी त्यांनी प्रथम साखरपा बसस्थानकाच्या वाढीव इमारतीच्या कामाची पाहणी करून काम ते लवकर पूर्ण करावे, अशा सूचना ठेकेदार कंपनीला देण्यात आले व वाढीव कामांसाठी निधी देणार असल्याचे आ. सामंत यांनी सांगितले. तसेच शिवसेना नेते संजय सुर्वे यांच्या साखरपा येथील निवासस्थानी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी यांना बोलावून रुग्णाला लागणारी औषधे व इतर सुविधा वेळेत मिळाल्या पाहिजेत व समस्या कळवा, त्या पूर्ण करु, अशा शब्दात त्यांनी आश्वस्त केले.
कित्येक वर्षे या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन परिचर नसल्याकारणाने मृतदेहाची हेळसांड होत आहे, ही बाब आमदार सामंत यांना समजताच जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांना फोन लावून लांजा राजापूर व साखरपा या ठिकाणी शवविच्छेदन परिचरांच्या नियुक्ती कराव्यात, अशा सूचना दिली.
भडकंबा दत्तवाडी येथील दत्त जयंती उत्सवास भेट देऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या व लवकरच तेथील विकासकामे पूर्ण करण्याचा शब्द दिला. साखरपा पंचक्रोशीतील कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी आमदार सामंत यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी शिवसेना नेते संजय सुर्वे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश पत्याणे, विलास बेर्डे, बापू शेट्ये राजेश कामेरकर, बापू लोटणकर प्रसाद आपंडकर, काशिनाथ सकपाळ शुभम गांधी, पिंट्या देवळेकर, साग- शिंदे, रुपेश कदम, महेश पावसकर अमर शिंदे, अंकुश सुर्वे, हेमंत शिंदे संतोष चव्हाण, संतोष भिंगार्डे, दीपक माने, बाळू जामसांडेकर, शशिकांत सावंत, मनोज चव्हाण, यश कोळवणकर, पत्तू शेडगे, गणेश वायदंडे तसेच भाग्यश्री सुर्वे, रेश्मा परशेटे, नेत्रा शिंदे, संध्या गांगण, प्रज्ञ बेर्डे, नेहा सावंत, रश्मी धरवळ व अनेक कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:02 PM 16/Dec/2024














