गुहागर : असगोलीहून प्रवाशांना घेवून येणारी बस बँक ऑफ इंडिया जवळ थांबली होती. त्याचवेळी मिडीबसच्या रेडीएटरचा पाईप फुटला.
रेडीएटरमधील उकळते, हिरवे पाणी पाईपमधुन वेगाने बाहेर पडले. हे गरम पाणी बँक ऑफ इंडियाजवळ उतरणारे प्रवासी आणि गाडीतील अन्य प्रवाशांच्या अंगावर उडून 20 ते 25 जण भाजले. या गोंधळात एक महिला गाडीतून उतरताना पडून जखमी झाली. काही प्रवाशांनी मागील खिडकीतून उड्या मारल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:24 PM 20/Dec/2024