ना. योगेश कदम उद्या खेडमध्ये

खेड : ना. योगेश कदम हे मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर दि. २२ डिसेंबर रोजी प्रथमच खेड दापोली मंडणगड मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांची कशेडी ते श्री काळकाईदेवी मंदीर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते खेड छत्रपती शिवाजी महाराज चौक खेड शहर मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी सर्व शिवसैनिक व नागरिकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे व शहर प्रमुख कुंदन सातपुते यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 21/Dec/2024